पुणे येथील मॉडेल कॉलनी पोस्ट ऑफिस येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन……
प्रतिनिधी: चेतन राऊत
पुणे : येथील शिवाजी नगर, मॉडेल कॉलनी पोस्ट ऑफिस चे पोस्ट मास्तर, तसेच पोस्ट कर्मचारी यांनी स्वच्छता मोहीम हाती घेऊन कचरा, शेवाळ, वाढलेले गवत इत्यादीची स्वच्छता करून परिसर स्वच्छ व सुंदर केला.मा. पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाला दाद देऊन मॉडेल कॉलनी पोस्ट ऑफिस ने स्वच्छ व सुंदर बनविण्याचे आवाहन स्वीकारले.
स्वछता अभियानात सहभागी झालेले पोस्ट मास्तर डांगे मॅडम, पोस्टल असिस्टंट म्हणून कार्यरत असलेले कांबळे सर, चव्हाण सर तुषार सर पोस्टमन म्हणून कार्यरत असलेले तावरे सर, कुदळे सर, तांबोडे सर, सावंत सर, लडकत सर, ननावरे सर, प्राजक्ता मॅडम, वर्षा मॅडम, शीतल बोडके, सावंत मॅडम,दिव्या राजपूत व सहभागी झालेले सर्व पोस्ट कर्मचारी यांनी स्वछता अभियान मध्ये सहभागी होऊन आपले श्रमदानं दिले