आव्हान संघटनेमार्फत कंत्राटी पद भरतीच्या निषेधार्थ सुशिक्षित बेरोजगारांनी केलेल्या “भीक मांगो” आंदोलनातून जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दानकंत्राटी करणारमुळे कायम स्वरूपी सरकारी नोक-या मिळण्याचे स्वप्न बेचिराख करणा-या शासनाच्या धोरणाचे संतप्त पडसाद युवा वर्गात उमटले असून यवतमाळ येथील आव्हान संघटनेच्या वतीने शहरात ‘भिक मांगो आंदोलन’ करुन गोळा झालेली ३५१ /- रुपये रक्कम जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीला दान दिली आहे. कंत्राटी करणाच्या धोरणाचा निषेध नोंदवत कायम स्वरूपी पदांची निर्मिती करून बेरोजगारांना न्याय देण्याची मागणी युवकांनी केली असून नेमण्यात आलेल्या नऊ कंत्राटी कंपन्यांचा अध्यादेश शासनाने मागे घेण्याची मागणी सुध्दा करण्यात आली आहे. या आंदोलनात “सुशिक्षित बेरोजगार” हे घोषवाक्य लिहिलेली टोपी परिधान करुन प्रद्युम्न जवळेकर,चंदू पवार,कुणाल कांबळे,सचिन मनवर,पंढरी पाठे,श्रीजित डफळे,जित भुते,सुरज पाटील,ज्ञानेश्वर चव्हाण,आशु पिंपळे,सात्विक बढाये,करण जुनगरे,अंकित डांगे,अतुल गजलवार,ज्ञानेश्वर गायकवाड,नंदू बुटे,प्रा.प्रवीण देशमुख,वैशाली सवई,प्रवीण भोयर,यशवंत इंगोले यांच्या सह अनेक बेरोजगार युवक सहभागी होते.