देशमुख नगरवासी स्वच्छ भारत मिशनं एक साथ, एक तास’ श्रमदान करण्याचं आवाहन केले
‘स्वच्छ भारत,स्वस्थ भारत,समृद्ध भारत मिशन’ ला आणखी यशस्वी बनविण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे पाऊल आहे.स्वच्छ भारत अभियान २०२३ स्वच्छता हीच सेवा आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशमुख नगर नेर मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्यात संपूर्ण देशमुख नगर वासीयांनी प्रामुख्याने श्री विपुल भाऊ देशमुख, श्री श्याम भाऊ देशमुख ,श्री गजानन उईके, श्री अशोक राव गोळे ,श्री लक्ष्मण राव चिरडे ,श्री सुनील भाऊ नवघरे, श्री नाजूक राव धांदे, श्री उर्गुंडे सर, श्री कदम भाऊ उत्साहाने सहभाग घेतला.महात्मा गांधी जयंती निमित्त भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी केलेल्या आवाहना अंतर्गत आज आपल्या भागामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छतेसाठी आपण सर्वांनी हातमिळवणी करूया चला सर्व एकत्र स्वच्छता ठेऊया, स्वच्छतेतच जीवन आहे.